प्रधानमंत्री पिक विमा योजना राज्यात 2016 पासून राबविण्यात येत आहे. योजनेची उद्दिष्टे १. नैसर्गिक आपत्ती किडी आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे. २. पिकांच्या नुकसानीचे अत्यंत कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे. ३. कृषी क्षेत्रासाठी च्या पतपुरवठ्यात सातत्य राखणे, जेणेकरून उत्पादनातील जोखमीपासून शेतकऱ्यांच्या संरक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा, पिकाचे विविधकरण आणि कृषी क्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धात्मक वाढ हे हेतू साध्य होण्यास मदत होईल. खरीप हंगाम भात,ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर,मका, भुईमूग, कारळे, तीळ,सूर्यफूल,सोयाबीन,कापूस,कांदा. रब्बी हंगाम ज्वारी, हरभरा, उन्हाळी,भुईमूग, कांदा इ पिकांचा समावेश आहे. जर आपण प्रधानमंत्री पिक विमा योजना मध्ये भाग घेतला असेल आणि आपल्या पिकाचे नुकसान झाले असेल तर 72 तासाच्या आत आपल्याला कंपनीला फोन कॉल, ई-मेल किंवा ॲप माध्यमाद्वारे आपल्या पिकनुकसानीची माहिती द्यावी लागते. शासनाने जिल्हा निहाय विमा कंपन्या...
हवामान, शासकीय योजना, अनुदान, कृषि सल्ला