प्रधानमंत्री पिक विमा योजना राज्यात 2016 पासून राबविण्यात येत आहे.
योजनेची उद्दिष्टे
१. नैसर्गिक आपत्ती किडी आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे.
२. पिकांच्या नुकसानीचे अत्यंत कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे.
३. कृषी क्षेत्रासाठी च्या पतपुरवठ्यात सातत्य राखणे, जेणेकरून उत्पादनातील जोखमीपासून शेतकऱ्यांच्या संरक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा, पिकाचे विविधकरण आणि कृषी क्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धात्मक वाढ हे हेतू साध्य होण्यास मदत होईल.
खरीप हंगाम
भात,ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर,मका, भुईमूग, कारळे, तीळ,सूर्यफूल,सोयाबीन,कापूस,कांदा.
रब्बी हंगाम
ज्वारी, हरभरा, उन्हाळी,भुईमूग, कांदा
इ पिकांचा समावेश आहे.
जर आपण प्रधानमंत्री पिक विमा योजना मध्ये भाग घेतला असेल आणि आपल्या पिकाचे नुकसान झाले असेल तर 72 तासाच्या आत आपल्याला कंपनीला फोन कॉल, ई-मेल किंवा ॲप माध्यमाद्वारे आपल्या पिकनुकसानीची माहिती द्यावी लागते. शासनाने जिल्हा निहाय विमा कंपन्या नियुक्त केलेल्या आहेत.
१. सर्वात प्रथम आपल्याला आपल्या गुगल प्ले स्टोर वरून Crop Insurance app डाउनलोड करा.
२. Continue without login त्यावर क्लिक करा.
4. Crop loss intimation त्यावर क्लिक करा.
5. मोबाईल नंबर ॲड करून ओटीपी ने व्हेरिफाय करा.
६. Season - Kharip निवडा.
Year - 2022
Scheme - Pradhanmantri fasal Bima Yojana
state - Maharashtra
Select
7. तुम्ही पीक विमा कुठे काढला आहे तो पर्याय सिलेक्ट करा.
Bank/ CSC/ Farmer online/Intermediary
त्यानंतर
१४ अंकी Policy number टाका. (पिक विमा काढला तेव्हा मिळालेल्या पावतीवर असतो.)
८. सिलेक्ट पॉलिसी नंबर वर क्लिक करा. तुम्हाला तुमची सर्व माहिती दिसेल.
त्यावर क्लिक करा.
९. Report incidence
हे भरताना काळजी पूर्वक भरा. यावर तुम्हाला नुकसान भरपाई लागू आहे कि नाही हे निश्चित होते.
Type of incidence मध्ये नुकसान कशामुळे झाले आहे हे टाका. जसे कि सध्या unseasonal Rains मुळे नुकसान झाले आहे.
त्यानंतर पीक कोणत्या अवस्थेत होते.
Standing crop/ Harvested / cut & spread/ Bundled condition
त्यानंतर
टक्केवारी
शेरा लिहा.
शेतात जाऊन फोटो आणि विडिओ अपलोड करा.
Submit
वर क्लिक करा.
त्यांनंतर तुम्हाला Docket Id मिळेल.
Vima Companya shetkryana fasvtat.
उत्तर द्याहटवा