आंबा फळ पीक विमा फक्त शेवटचे १० दिवस बाकी नमस्कार शेतकरी बंधुनो आंबा या फळाला फळांचा राजा म्हटलं जात. परंतु सध्याचे वातावरण पाहता विविध हवामान धोक्यामुळे या फळपिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होऊन मोठ्या प्रमाणात उत्पन्नात घट निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. या बाबीचा विचार करूनच फळपीक नुकसान भरपाई मिळावी या उद्देशाने प्रधानमंत्री फसल विमा योजने अंतर्गत हवामान आधारित फळपीक विमा शासन राबावत आहे. वय आंबा या पिकासाठी ५ वर्ष वयाचे झाडाचा विमा उतरवू शकता. हवामान धोके व विमा संरक्षण कालावधी कोकण विभागासाठी १. अवेळी तापमान -१ डिसेंबर ते १५ मे २. कमी तापमान -१ जानेवारी ते १० मार्च ३. जास्त तापमान - १ मार्च ते १५ मे ४. वेगाचा वारा - १६ एप्रिल ते १५ मे ५. गारपीट - १ फेब्रुवारी ते ३१ मे कोकण वगळून इतर विभागासाठी १. अवेळी तापमान -१ जानेवारी ते ३१ मे २. कमी तापमान - १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी ३. जास्त तापमान - १...
हवामान, शासकीय योजना, अनुदान, कृषि सल्ला