आंबा फळ पीक विमा फक्त शेवटचे १० दिवस बाकी

नमस्कार शेतकरी बंधुनो आंबा या फळाला फळांचा राजा म्हटलं जात. परंतु सध्याचे वातावरण पाहता विविध हवामान धोक्यामुळे या फळपिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होऊन मोठ्या प्रमाणात उत्पन्नात घट निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. या बाबीचा विचार करूनच फळपीक नुकसान भरपाई मिळावी या उद्देशाने प्रधानमंत्री फसल विमा योजने अंतर्गत हवामान आधारित फळपीक विमा शासन राबावत आहे.
वय
आंबा या पिकासाठी ५ वर्ष वयाचे झाडाचा विमा उतरवू शकता.
हवामान धोके व विमा संरक्षण कालावधी
कोकण विभागासाठी
१. अवेळी तापमान -१ डिसेंबर ते १५ मे
२. कमी तापमान -१ जानेवारी ते १० मार्च
३. जास्त तापमान - १ मार्च ते १५ मे
४. वेगाचा वारा - १६ एप्रिल ते १५ मे
५. गारपीट - १ फेब्रुवारी ते ३१ मे
कोकण वगळून इतर विभागासाठी
१. अवेळी तापमान -१ जानेवारी ते ३१ मे
२. कमी तापमान - १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी
३. जास्त तापमान - १ मार्च ते ३१ मार्च
४. वेगाचा वारा - १ एप्रिल ते ३१ मे
५. गारपीट - १ फेब्रुवारी ते ३१ मे
मर्यादा
एक शेतकरी जास्तीत जास्त ४ हे. क्षेत्राचा विमा नोंदणी करू शकता.
विमा योजनेत सहभागी होण्याचा कालावधी
कोकण विभागासाठी - ३० नोव्हेंबर
कोकण वगळून इतर विभागासाठी - ३१ डिसेंबर
जिल्यानिहाय विमा संरक्षित रक्कम आणि शेतकरी हिस्सा हेक्टरी रक्कम
अहमदनगर - १४०००० - १७५००
सिंधुदुर्ग -१४०००० -७०००
नाशिक -१४०००० -७०००
वाशीम -१४०००० -१६१००
ठाणे -१४०००० -२१७००
सांगली -१४०००० -१६१००
औरंगाबाद -१४०००० -१२६००
बीड -१४०००० -१४०००
सातारा -१४०००० -१०५००
परभणी -१४०००० -१८९००
जालना १४०००० - २१०००
लातूर -१४०००० -१६८००
कोल्हापूर -१४०००० -१४०००
रायगड -१४०००० -२९४००
बुलढाणा -१४०००० -१५४००
जळगाव -१४०००० -२३८००
नांदेड -१४०००० -२३१००
पुणे -१४०००० - १५४००
उस्मानाबाद -१४०००० -७०००
पालघर -१४०००० -२०३००
रत्नागिरी -१४०००० - १३३००
धुळे -१४०००० -२३१००
सोलापूर -१४०००० -१०५००
नंदुरबार -१४०००० -१०५००
गारपीट नुकसान भरपाई साठी वेगळी रक्कम अदा करावी लागेल.
विमा काढण्याचे ठिकाण
कर्जदार शेतकरी त्या त्या बँकेत किंवा कृषी पत पुरवठा सहकारी संस्था मधून
बिगर कर्जदार शेतकरी हे बँकेत, कृषी पत पुरवठा सहकारी संस्था, आपले सरकार CSC सेंटर मधून फॉर्म भरून सहभागी होऊ शकता.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा