मुख्य सामग्रीवर वगळा

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजने अंतर्गत शेततलाव

 

मुख्यमंत्री शाश्वत कृषी कृषि सिंचन योजने अंतर्गत शेततलाव 



    एकूण ८२ टक्के शेतकरी सर्वस्वी अवलंबुन असलेली कोरडवाहू शेती आहे. राज्याच्या विविध भागात पावसाचे असमान वितरण आणि पावसातील अनिश्चित खंड हि नैसर्गिक आपत्ती आहे. यासाठी सिंचनाची  सोया व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र शासन कृषी विभाग शेकऱ्यांसाठी शेत तलावाची योजना सुरू केली आहे. सन २०२२ - २३ या आर्थिक वर्षाकरिता १३५०० वैयक्तिक शेततळे करण्याचे उद्दिष्ट ठरले आहे.

पात्रता

१. अर्जदार स्वत:च्या नावावर ०.६० हेक्टर क्षेत्र आवश्यक आहे

२. अर्जदाराची जमीन तांत्रिक दृष्टया योग्य असावी.

३. शेतकरी अर्जदाराने या पूर्वी शेत तलावासाठी इतर योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

 अर्ज सादर करण्याची पद्धत

 कृषी विभाग महाडीबीटी या पोर्टल वर ऑनलाइन अर्ज सादर करावे.

 लाभार्थी निवड

 कृषी विभागाने विकसित केलेल्या mahadbt पोर्टल वर प्राप्त अर्जाची सांगणकीय प्रणाली द्वारे सोडत निघेल. 

कागदपत्र

फक्त करण्यासाठी

१. ७/१२

२.८अ

३.आधार कार्ड

४. पासबुक

५. मोबाईल नंबर 



 इनलेट आउटलेटसह व इनलेट आउट लेट विरहित असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत..

 आकारमान मिटर मध्ये 


१५x१५x३

20x15x3

20x20x3

25x20x3

25x25x3

30x25x3

30x30x3

३४x३४x३

 जास्तीत जास्त 75 हजार रुपये अनुदान आहे.  सर्व साधारण क्षेत्रा पेक्षा इतर उपाय योजना व डोंगराळ क्षेत्र यांना अनुदान जास्त आहे. आकार मानानुसार अनुदान खालाली फोटो प्रमाणे आहे.






 मंजूर अनुदानपेक्षा अधिका खर्च झाल्यास सदरील खर्च लाभार्थ्याने स्वत: करणे आवश्यक आहे.

  कार्यारंभ आदेश मिळाल्यापासून ३ महिन्याच्या आत काम पूर्ण करणे बंधनकारक आहे.

 शेत तलावाचे काम पूर्ण झाल्याशिवाय अनुदान मिळणार नाही. खोदाई साठी अग्रीम मिळणार नाही.

 ➡ शेत तलावाची निगा राखणे, प्लास्टिक अस्तरीकरण करणे, कंपाउंड करणे,शेत तलावाच्या बांधावर गवत लावणे , दुरुस्ती करणे ,ही कामे स्वखर्चाने  शेतकऱ्यांना करावी लागेल.

  शेततलावाचे काम पूर्ण झाल्यानंतर बोर्ड लावणे बंधनकारक असेल.


MAHADBT या साइटवर अर्ज कसा करू शकता पहा सविस्तर माहितीसाठी खालील पोस्ट वाचा. 

https://www.blogger.com/blog/post/edit/8998692625561381171/2293987161177016695#:~:text=https%3A//krushijagar.blogspot.com/2022/09/mahadbt.html

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

PM kisan योजनेचा हप्ता होणार या तारखीला जमा

 केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पीएम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्याची  घोषणा केली आहे. फेब्रुवारी महिन्यात 24 फेब्रुवारी ला हप्ता वितरीत केला जाणार आहे. PM KISAN योजना ही भारत सरकारची एक प्रमुख उपक्रम आहे ज्याचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे आहे.  योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची मदत दिली जाते. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी 2000 रुपये तीन हप्त्यांमध्ये जमा केले जातात. आतापर्यंत शेतकऱ्यांना पीएम किसानचे 18 हप्ते देण्यात आले आहेत.

MAHADBT या योजनेत अर्ज करून मिळवू शकता शेती उपयोगी सर्व अवजारे

शेतकरी बंधुनो एखाद्या सरकारी योजनेचा लाभ घायचा असल्यास सर्व कागदपत्र गोळा करून सरकारी कार्यालयात चकरा माराव्या लागतात. हा सर्वसामान्य जनतेचा अनुभव आहे. यातून मुक्त होण्यासाठी कृषि विभागाने MAHADBT पोर्टल सुरु केले आहे. तुम्हाला कृषि विभागाच्या कार्यालयात  जाण्याची गरजच आता राहिली नाही.  आणि कागपत्रेही द्यायची आवश्यकता नाही. तुम्ही घर बसल्या अर्ज करून योजनेचा लाभ घेऊ शकता. कृषी विभागाने MAHADBT  या online  पोर्टल वर सर्व योजना एकाच अर्जात आणल्या असून तुम्ही एकदा अर्ज करून तुम्हाला  आवश्यक असणाऱ्या ट्रॅक्टर पासून ते फवारणी पंप पर्यंत सर्व यंत्र सामुग्री तसेच ठिबक सिंचन, तुषार सिंचन, इंजिन, मोटार, पाईप या सर्व घटकासाठी या प्रणाली वर अर्ज करू शकता.  अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहे.  १. आधार कार्ड २. ७/१२  ३. ८ अ  ४ बँक खाते क्र आणि IFSC Code  ५. आधार कार्ड लिंक मोबाईल नंबर (लिंक नसल्यास बायोमेट्रिक मशीन लागेल) असा करा अर्ज mahadbtmahait Farmer Login  या साईट वर जा. किंवा खालील लिंक वर क्लीक करा.  https://mahadb...

७/१२ व ८अ साठी तलाठी ऑफिस ला जायची आवश्यकता नाही. आता मोबाईल वरच काढा डिजिटल ७/१२ डाउनलोड.

नमस्कार शेतकरी बंधुनो आपल्याला नेहमीच ७/१२ व ८अ ची गरज भासत असते. आता बऱ्याच  ठिकाणी स्कॅन केलेले  ७/१२ व ८ अ ऑनलाईन दयावे लागतात. आता तुम्हाला तुमच्या मोबाईल वरून घर बसल्या ७/१२ व ८अ काढता येणार आहे. हे ७/१२ डिजिटल असल्यामुळे त्यावर तुम्हाला तलाठी च्या  सहीची आवश्यकता नाही. तुम्ही डाउनलोड केलेले ७/१२ व ८अ सर्व शासकीय कामासाठी वापरता येणार आहे. खालील प्रमाणे तुम्ही तुमच्या शेताचे ७/१२ व ८अ  काढू शकता.  digitalsatbara.mahabhumi.gov.in  वर जा.Regular Login मध्ये जाऊन तुम्ही तुमचा Login Id व Password  तयार करून घ्या. किंवा  OTP Based Login वर जाऊन तुमचा मोबाईल नंबर टाका व OTP  टाकून लॉगिन करू शकता. यामध्ये तुम्ही डिजिटल ७/१२, ८ अ , डिजिटल स्वाक्षरी प्रॉपर्टी कार्ड व डिजिटल स्वाक्षरी केलेले इ फेरफार काढू शकता.  👉 ७/१२ काढण्यासाठी  जिल्हा  तालुका  गाव  सर्वे नंबर/ गट नंबर सर्वे नंबर/ गट नंबर हिस्सा निवडा.  👉 ८ अ  काढण्यासाठी  जिल्हा  तालुका  गाव  खाते क्रमांक (माहित नसल्यास नावानुसार शो...