नमस्कार शेतकरी बंधुनो आपल्याला नेहमीच ७/१२ व ८अ ची गरज भासत असते. आता बऱ्याच ठिकाणी स्कॅन केलेले ७/१२ व ८ अ ऑनलाईन दयावे लागतात. आता तुम्हाला तुमच्या मोबाईल वरून घर बसल्या ७/१२ व ८अ काढता येणार आहे. हे ७/१२ डिजिटल असल्यामुळे त्यावर तुम्हाला तलाठी च्या सहीची आवश्यकता नाही. तुम्ही डाउनलोड केलेले ७/१२ व ८अ सर्व शासकीय कामासाठी वापरता येणार आहे. खालील प्रमाणे तुम्ही तुमच्या शेताचे ७/१२ व ८अ काढू शकता.
digitalsatbara.mahabhumi.gov.in वर जा.Regular Login मध्ये जाऊन तुम्ही तुमचा Login Id व Password तयार करून घ्या. किंवा OTP Based Login वर जाऊन तुमचा मोबाईल नंबर टाका व OTP टाकून लॉगिन करू शकता. यामध्ये तुम्ही डिजिटल ७/१२, ८ अ , डिजिटल स्वाक्षरी प्रॉपर्टी कार्ड व डिजिटल स्वाक्षरी केलेले इ फेरफार काढू शकता.
👉७/१२ काढण्यासाठी
जिल्हा
तालुका
गाव
सर्वे नंबर/ गट नंबर
सर्वे नंबर/ गट नंबर हिस्सा निवडा.
👉८ अ काढण्यासाठी
जिल्हा
तालुका
गाव
खाते क्रमांक (माहित नसल्यास नावानुसार शोधा.)
👉इ फेरफार काढण्यासाठी
जिल्हा
तालुका
गाव
फेरफार क्रमांक टाका (७/१२ वर असतात )
👉डिजिटल स्वाक्षरी प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी
विभाग
जिल्हा
कार्यालय (उप अधीक्षक भूमी अभिलेख तालुका )
गाव /पेठ
C. T. S. नंबर टाका.
डाउनलोड करा.
👉७/१२, ८ अ , डिजिटल स्वाक्षरी केलेले इ फेरफार साठी १५ रुपये रक्कम आकारली जाते.
डिजिटल स्वाक्षरी प्रॉपर्टी कार्ड साठी तुम्हाला तुमच्या गावानुसार वेगवेगळी रक्कम आकारली जाते.
👉Recharge account वर जा
१५ ते १००० पर्यंत तुम्ही पैसे जमा करू शकता.
यामध्ये तुम्ही डेबिट/क्रेडिट कार्ड , इंटरनेट बँकिंग, भीम UPI यापैकी एका पर्यायाचा वापर करून पैसे जमा करू शकता.
सात बारा व ८अ साठी प्रत्येकी रु.१५/- ऑनलाइन भरावे लागतात. त्यासाठी SBI किंवा Bank of Baroda या मधील खात्यामधूनच भरावे लागतात. तेथे सर्व राष्ट्रीय बँकेचे विकल्प असावयास हवे. याबाबत काही करता येईल का ते पहावे.
उत्तर द्याहटवाSBI बँक निवडून पुढे गेले तर त्यामध्ये UPI/QR कोड चा पर्याय आहे.
हटवाSunder
उत्तर द्याहटवा७/१२ व ८ अ इ.इ.साठी फक्त दोन बॅंकांचा पर्याय दिलेला आहे.हे खटकते. सर्व महत्वाच्या बॅकांचा समावेश असणे गरजेचे आहे. शासनाने यांचा विचार करावा.
उत्तर द्याहटवाchan mahiti.
उत्तर द्याहटवा