भातावर विविध प्रकारचे किडी रोग आपणास दिसून येत असतात. या वर्षी परतीचा मान्सून लांबलेला दिसून येत आहे. त्यामुळे पावसाची उघडझाप आणि दमट वातावरणामुळे काही ठिकाणी दुधाळ अवस्थेत असलेल्या हळव्या भातावर गंधी बग /ढेकण्या चा प्रादुर्भाव दिसून येतो. याला स्थानिक भाषेत पोपट्या असे बोलतात.
ओळख -
या किडीची ओळख रंग तांबूस हिरवट, पाठीवर त्रिकोण, तोंडावर दोन स्पर्शीका (मिशीसारखी). जवळ जाताच उडतो. हात लावल्यास दुर्गंधी येते. ही सकाळी किंवा संध्याकाळी आढळून येते.
नुकसान पद्धत -
भात पिकाच्या लोंबीवरील पीक दुधाळ अवस्थेत असताना प्रौढ ढेकण्या व त्याची लहान पिल्ले दाण्याला छिद्र पाडून आतील रस (दूध) शोषून घेतात. त्यामुळे दाणा भरताना काळा पडलेला दिसतो. दाणे पोचट राहतात आणि लोंब्या अर्धवट भरतात. अशा दाण्यावर एक सूक्ष्म छिद्र दिसून येते व छिद्राभोवती काळपट, तपकिरी ठीपका तयार होतो.
आर्थिक नुकसान पातळी -
प्रती चूड १ ढेकण्या दिसल्यास आर्थिक नुकसान पातळी ओलांडली अशी समजावे.
कीड नियंत्रण -
१. बांधावरील गवत कापून बांध स्वच्छ ठेवावेत.
२. पक्षी थांबे लावावे.
३.लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५ टक्के प्रवाही ५ मी.ली. किंवा डेल्टामेथ्रीन २.८% प्रवाही ९ मी .ली. प्रमाणात १० लिटर पाण्यातून फवारावे किंवा
४. १.५ टक्के क्लोरपायरीफॉस भकुटी ८ किलो प्रति एकरी सायंकाळी किंवा सकाळी लवकर वारा शांत असताना धुरळावी.
अधिक माहितीसाठी खालील विडिओ पहा.
👇
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा