प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME)
केंद्र शासनाच्या 'आत्मनिर्भर भारत' मोहीम अंतर्गत सन २०२०-२०२१ ते २०२४-२५ या पाच वर्षासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या योजनेला सुरवात केली आहे. नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी किंवा पूर्वीचा व्यवसाय वाढवण्यासाठी शासन हि योजना राबवत आहे.
उद्देश ⟶
असंघटीत क्षेत्रातील अन्न प्रकिया उद्योग मुख्य प्रवाहात आणणे. नाशवंत कृषि मालावर प्रक्रिया करून मालाचे मूल्यवर्धन होऊन उत्पादकांचे उत्पन्न वाढवणे. पारंपारिक स्थानिक उत्पादने जपवणूक करून त्यांचा प्रचार व प्रसार करणे. महिला स्वयंसहाय्यता गटामार्फत महिलांना सन्मान व प्रतिष्ठा मिळवून देणे. उत्पादनावर प्रक्रिया,पॅकेजिंग, मार्केटिंग व ब्रँडिंग यासाठी साह्य करणे.
लाभार्थी⟶
१. शेतकरी/युवक /उद्योजक
२. शेतकरी उत्पादक संस्था
३. शेतकरी उत्पादक कंपन्या
४. सहकारी संस्था
५.स्वयंसहायता गट व त्यांचे संघ
६. शासकीय संस्था
समाविष्ट उद्योग धंदे⟶
आंबा,द्राक्ष,डाळिंब, केळी, संत्रा, मोसंबी, चिंच, जांभूळ, फणस, करवंद, काजू, तृण धान्य, कडधान्य, टोमॅटो, बटाटा, पापड,लोणची,मसाला पिके यावर आधारित उत्पादने, दूध व पशु उत्पादने, मांस उत्पादने,वन उत्पादने इत्यादी वर आधारित प्रक्रिया उद्योग.
दूध प्रक्रिया ⟶
खवा, बर्फी, पेढे,श्रीखंड, पनीर, दही, ताक, तूप, लस्सी.
मसाले प्रक्रिया ⟶
चटणी मसाला, कांदा -लसूण मसाला, मालवणी मसाला,मटन चिकन मसाला
चटणी प्रक्रिया ⟶
शेंगदाणा चटणी, खोबरे चटणी, जवसाची चटणी
तेल घाणा प्रक्रिया ⟶
शेंगदाणा, सोयाबीन, सूर्यफूल, तीळ, बदाम व सर्व प्रकारचे तेल उत्पादने
पावडर उत्पादने प्रक्रिया ⟶
काश्मिरी मिरची, लवंगी मिरची, धना, जीरा, गुळ, हळद इत्यादी
बेकरी उत्पादन प्रक्रिया ⟶
बिस्किट,खपली गहू बिस्किट, मैदा बिस्किट,नानकटाई, क्रीम रोल, मैसूर पाक केक, बर्फी, खारी,टोस्ट, ब्रेड, बन पाव, शेव, फरसाण, चिवडा, भडंग केळी चिप्स,बटाटा चिप्स, फुटाणे, चिरमुरे इत्यादी.
कडधान्य प्रक्रिया ⟶
हरभरा व इतर डाळी पॉलिश करणे.
राईस मिल, तांदूळ पोहा प्रकिया ⟶
यासारखे वरील विविध व्यवसाय करता येतील. त्यामध्ये कृषी मालावर प्रक्रिया करून पॅकिंग सह विक्री करणे आवश्यक आहे. व्यवसायासाठी लागणाऱ्या मशिनरी व पॅकिंग साठी लागणाऱ्या मशिनरीसाठी ३५ टक्के अनुदान देय आहे. बँक लोन अनिवार्य आहे. व लाभार्थीला १० टक्के गुंतवणूक करावी लागेल. सदर व्यवसायाचा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवावा लागेल. प्रोजेक्ट ची एकूण किंमत १ लाख पेक्षा असावी. प्रोजेक्ट रिपोर्ट मदतीसाठी शासन DRP ची नेमणूक करते. तुम्हाला आवश्यक ती मदत करेल.
पात्रतेच्या अटी ⟶
अ - वैयक्तिक अर्जदार पात्रता वाटी
१. अर्जदाराचे वय 18 वर्षे पूर्ण असावे.
२. आज उद्या बँकेत खाते असावे.
३. अर्जदाराची प्रकल्प किमतीचे किमान दहा टक्के रक्कम गुंतवण्याची क्षमता असावी.
४. उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी स्वतःची अथवा कराराची जागा असावी.
५. एका कुटुंबातील एकच व्यक्ती या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहील.
ब - शेतकरी गट बचत गट सहकारी संस्था पात्रता व अटी
१. कंपनी /संस्था/ बचत गट नोंदणीकृत व लेखापरीक्षेत असावे.
२. सर्व सभासद क्रियाशील व सक्रिय असावेत.
३. संस्थेचे बँकेत खाते व वार्षिक उलाढाल असावी.
४. दहा टक्के स्व गुंतवणुकीची क्षमता असावी.
५. शासनाने वेळोवेळी जाहीर केलेल्या नियम व अटी.
अर्थसहाय्य ⟶
१. वैयक्तिक लाभार्थी भांडवली गुंतवणूक करता 35 टक्के अनुदान १० लाख रुपये मर्यादेपर्यंत.
२. भांडवली गुंतवणूक व सामायिक पायाभूत सुविधा गट लाभार्थी 35 टक्के अनुदान कमाल शासन निर्णयानुसार.
३. मार्केटिंग ब्रँडिंग 50% अनुदान कमाल शासन निर्णयानुसार.
अधिक माहितीसाठी शेतकरी मासिक जून 2022 किंवा जवळच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
अशा विविध माहितीसाठी व्हाट्सअप अँप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर जा.
https://chat.whatsapp.com/BYBQ5WMwTqQ0iG5b1Xc7Rj
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा