पाने गुंडाळणारी अळी अर्थात बग्या
लक्षणे-
पाने गुंडाळणारी अळी पानावरील हरितद्रव्य खरडून खात असल्यामुळे भाताचे पाने पांढरे पडलेले दिसतात तसेच पाने दुमडलेले दिसतात याला स्थानिक भाषेत बग्या असे म्हणतात.
एकात्मिक व्यवस्थापन-
बांधावरील गवत काढून बांध स्वच्छ ठेवावेत.
ट्रायकोग्रामा जापोनिकम किंवा ट्रायकोग्रामा चिलोनीस या परोपजीवी कीटकाची 50,000 अंडी प्रतिहेक्टरी पिकामध्ये सोडावीत.
प्रत्येक चुडात 1 ते 2 नवीन कीडग्रस्त पाने दिसल्यास प्रतिहेक्टरी हायड्रोक्लोराईड 500 ग्रॅम
किंवा
क्लोरपायरीफॉस (20 टक्के) 1875 मि.लि.
किंवा
क्विनॉलफॉस (25 ईसी) 1000 मि.लि. प्रति 500 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
अधिक माहिती साठी व्हिडिओ पहा 👇🏻👇🏻
https://youtu.be/k4TcATs68BY
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा