प्रधानमंत्री किसान सन्मान योजना १२ वा हप्ता जमा होण्यापूर्वी तुमचे नाव यादीत आहे की नाही असे चेक करा.
PM KISAN (प्रधानमंत्री किसान सन्मान योजना) डिसेंबर २०१८ पासून शेतकरी कुटुंबाला (कुटुंबाची व्याख्या पती,पत्नी व त्यांची अल्पवयीन १८ वर्षाखालील मुले) पाठबळ देण्यासाठी केंद्र शासनाने ह्या योजनेला सुरवात केली. या योजेनेसाठी १०० टक्के केंद्र शासन अर्थ सहाय्य करते. सुरवातीला अल्प व अत्यल्प जमीनधारक असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेसाठी पात्र ठरवले पण नंतर मात्र सर्वाना या योजेचा लाभ दिला. या योजनेतून प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या खात्यावर आर्थिक मदत म्हणून तीन हप्त्यात वर्षाला ६०००/- रुपये इतकी रक्कम वर्ग करण्यात येत आहे.
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यातच २०००/- जमा झाले होते. परंतु या वेळेस अजून जमा झालेले नाही. कारण बऱ्याच शेतकऱ्यांनी पात्र नसताना हि नाव नोंदणी केली होती. त्यामुळे EKYC बंधनकारक करावी लागली. त्यामुळे जवळपास ४० लाख शेतकऱ्यांनी EKYC केली नाही. तसेच भूलेख पडताळणी चे काम चालू होते. या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर २०२२ मध्ये १२ वा हप्ता जमा होणे अपेक्षित आहे.
१२ वा हप्ता जमा होण्यापूर्वी तुमचे नाव यामध्ये आहे कीं नाही ते चेक खालील प्रमाणे तपासून पहा.
https://pmkisan.gov.in/
या साईट वर जा


राज्य
जिल्हा
तहसील
गाव निवडा
Get Report वर क्लिक करा. यामध्ये पूर्ण
गावाची यादी दिसेल.
अशा विविध माहितीसाठी व्हाट्सअप अँप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर जा.
https://chat.whatsapp.com/BYBQ5WMwTqQ0iG5b1Xc7Rj
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा