शेतकरी बंधुनो एखाद्या सरकारी योजनेचा लाभ घायचा असल्यास सर्व कागदपत्र गोळा करून सरकारी कार्यालयात चकरा माराव्या लागतात. हा सर्वसामान्य जनतेचा अनुभव आहे. यातून मुक्त होण्यासाठी कृषि विभागाने MAHADBT पोर्टल सुरु केले आहे. तुम्हाला कृषि विभागाच्या कार्यालयात जाण्याची गरजच आता राहिली नाही. आणि कागपत्रेही द्यायची आवश्यकता नाही. तुम्ही घर बसल्या अर्ज करून योजनेचा लाभ घेऊ शकता.
कृषी विभागाने MAHADBT या online पोर्टल वर सर्व योजना एकाच अर्जात आणल्या असून तुम्ही एकदा अर्ज करून तुम्हाला आवश्यक असणाऱ्या ट्रॅक्टर पासून ते फवारणी पंप पर्यंत सर्व यंत्र सामुग्री तसेच ठिबक सिंचन, तुषार सिंचन, इंजिन, मोटार, पाईप या सर्व घटकासाठी या प्रणाली वर अर्ज करू शकता.
अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहे.
१. आधार कार्ड
२. ७/१२
३. ८ अ
४ बँक खाते क्र आणि IFSC Code
५. आधार कार्ड लिंक मोबाईल नंबर (लिंक नसल्यास बायोमेट्रिक मशीन लागेल)
असा करा अर्ज
mahadbtmahait Farmer Login या साईट वर जा.
किंवा खालील लिंक वर क्लीक करा.
https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Login/Login
उजव्या कोपऱ्यातील नवीन अर्जदार नोंदणी करा वर क्लिक करा.
कृषी यांत्रिकरण
१) ट्रॅक्टर
२) पॉवर टिलर
३) ट्रॅक्टर/ पॉवर टिलर चलित अवजारे
४) बैल चलित यंत्र/अवजारे
५) मनुष्य चलित यंत्र/अवजारे
६) प्रक्रिया संच
७) काढणी पश्च्यात तंत्रज्ञान
८) फलोत्पादन यंत्र/अवजारे
९) वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे
१०) स्वयं चलित यंत्रे
भाडे तत्वावरील सुविधा केंद्र:
१) कृषि अवजारे बँकेची स्थापना
२) उच्च तंत्रज्ञान , उत्पादन सेवा सुविधा केंद्राची स्थापना
वरील घटकासाठी अर्ज करायचा असल्यास कृषी यांत्रिकरण समोरील बाबी निवडा वर क्लीक करा. आपणास हवे असलेल्या घटकाची निवड करा. व जतन करा. व मेनू वर जा.त्यानंतर तुम्ही मी अर्ज केलेल्या बाबी वर जाऊन स्वतःचा अर्ज पाहू शकता.
अतिशय सुंदर माहिती देत आहात सर,,खूप खूप आभार ...
उत्तर द्याहटवाGood
उत्तर द्याहटवा